नाटक या साहित्यप्रकाराचा अभ्यास
मेजर १ आणि २
प्रथम वर्ष कला, सत्र १
सुमारे दोन हजार वर्षापासून मराठी भाषा
व मराठी वाङ्मय हे आपल्या अभिजात वैशिष्ठ्यामुळे भाषेच्या प्रवाहात आपले महत्वपूर्ण
स्थान टिकवून आहे. आज ज्ञात असलेल्या महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मयापासनू आजतागायत
मराठी भाषेने व साहित्याने आपली विविध रूपे धारण केली आहेत. मराठी वाङ्मयाच्या मुळाशी
कार्यरत असणाऱ्या अनेकविध प्रेरणा व प्रवृतींचा विद्यार्थ्यांना परीचय होणे, आधुनिक
मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या स्वरूपाचे त्यांना आकलन होणे, भाषेच्या शास्त्रीय स्वरूपाचा
परिचय होणे, साहित्याच्या माध्यमातून समाज व संस्कृतींचा परिचय
घडणे व साहित्याच्या सांस्कृतिक संदर्भांची जाण निर्माण होणे. विद्यार्थ्यामध्ये साहित्याविषयक
अभिरुची संवेदन क्षमता निर्माण होणे साहित्य कलेचा आस्वाद व समीक्षा निर्माण होणे.
विविध भाषिक कौशल्यांचा परिचय होऊन त्यांच्या उपयोजनांची क्षमता वाढी सोबतच आधुनिक
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने श्रवण, लेखन व वाचन या कौशल्यांवर समायोजित प्रभुत्व निर्माण
करणे हे सदर अभ्यासक्रमाचे ध्येय आहे.
नाटक या साहित्यप्रकाराचा अभ्यास
नवीन शिक्षण धोरण २०२० नुसार कला पदवीसाठी
मराठी मुख्य विषय निवडणाऱ्या पहिल्या सत्रात ‘नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास’ ही अभ्यासपत्रिका अध्ययनासाठी आहे. प्राचीन काळापासून भारतीय व पाश्च्यात्त
देशात ‘नाटक’ हा एक महत्त्वाचा साहित्य
प्रकार राहिला आहे. मराठी भाषेतही नाटक या महत्त्वाच्या साहित्य प्रकारची समृद्ध परंपरा
आहे. म्हणून मराठी भाषेत साहित्याचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘नाटक’ या साहित्यप्रकाराचे
अध्ययन महत्त्वाचे ठरते. ‘नाटक या साहित्यप्रकाराचा अभ्यास’
या अभ्यासपत्रिकेत ‘नाटक’ या साहित्याचे तात्विक स्वरूप व निवडलेल्या साहित्यकृती अभ्यासासाठी आहेत.
अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्ये-
1.
नाटक या साहित्यप्रकाराची कल्पना समजून घेणे.
2.
नाटक या साहित्यप्रकाराच्या स्वरूप वैशिष्ट्यांचा परिचय करून घेणे.
3.
नाटक या साहित्यप्रकाराच्या संहिता आणि प्रयोग या दोन अंगांचा परिचय
करून देणे.
4.
विद्यार्थ्यांना नाटकाचा आशय समजून घेता येणे, रसग्रहण करता येणे.
1.
नाटक या साहित्य प्रकाराची संकल्पना विद्यार्थी समजून घेतील.
2.
नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण विद्यार्थ्यांना शिकता येईल.
3.
विद्यार्थ्यांना नाटक या साहित्य प्रकाराची रचना व वैशिष्ट्ये समजून
घेता येईल.
4.
नाटकातील स्री, समाज, संस्कृती, राजकारण , हितसंबंध, विचारसरणी
इत्यादीचे विद्यार्थ्यांना विश्लेषण करता येईल, त्या विषयीचे
भान निर्माण होईल.
घटक १ : नाटक या साहित्य प्रकाराचे तात्विक विवेचन
अ) नाटक या साहित्यप्रकाराचे स्वरूप
१. नाटकाची संकल्पना, नाटकाची दोन रुपे- संहिता व प्रयोग
२. नाट्य संहितेतील घटक : विषयसूत्र , संविधानक, (कथानक),
पात्र, संवाद, भाषा,
काल-अवकाश, रंगसूचना
१. शोकात्मिका (Tragedy), सुखात्मिका (Comedy), प्रहसन (Farce), अतिरंजित नाट्य (Melodrama),
वगनाट्य, दीर्घांक, एकांकिका
(६० मिनिटांच्याच्या १५ तासिका) श्रेयांकन १
अ. विच्छा माझी पुरी करा - वसंत सबनीस
(६० मिनिटांच्याच्या १५ तासिका) श्रेयांकन १
अ. ढोलताशे - चं. प्र. देशपांडे
(६० मिनिटांच्याच्या १५ तासिका) श्रेयांकन १
अ. उतारा - प्रेमानंद गज्वी
आ. आकडा – राजकुमार तांगडे
(६० मिनिटांच्याच्या १५ तासिका) श्रेयांकन १





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा