सारांश
कवी संजय गगे खरीडकर यांच्या “पाऊस” या कवितेतील पाऊस केवळ निसर्गघटना नसून तो प्रेम, विरह, ओढ, स्मृती
आणि अंतर्मनातील अस्वस्थतेचे बहुअर्थी प्रतीक म्हणून अवतरतो. प्रस्तुत शोधनिबंधात
कवितेतील आशय, प्रतीकविश्व
आणि भावसौंदर्य यांचा चिकित्सक अभ्यास केला आहे. कवितेच्या केंद्रस्थानी कवी, प्रेयसी आणि पाऊस असा त्रिकोणी भावसंबंध
आहे. प्रेयसीला पाऊस आवडतो म्हणून कवीही पावसाशी एकरूप होतो; मात्र पाऊस प्रेयसीपर्यंत पोहोचत असताना
कवी दूर उभा राहून त्या भेटीचा अनुभव घेतो. त्यामुळे प्रेमातील संकोच, असुरक्षितता आणि एकतर्फी ओढ प्रभावीपणे
व्यक्त होते.
कवितेत घर, अंगण, दार, गच्ची, ओंजळ आणि मिठी या प्रतिमा भावनिक अंतर आणि
जवळीकता यांचे स्तर सूचित करतात. पावसाचे मानवीकरण हे या कवितेचे ठळक वैशिष्ट्ये
आहे. पाऊस धिंगाणा घालतो, हाक
मारतो, आठवण काढतो आणि प्रेयसीशी संवाद साधतो, त्यामुळे कविता नाट्यात्म बनते. भाषाशैली
साधी, बोलकी, गेय
आणि पुनरुक्तीवर आधारलेली आहे. तसेच “पाऊस” या शब्दाची पुनरावृत्ती लय, भावगांभीर्य आणि स्मरणीयता निर्माण करते.
कवितेचा
शेवट परमार्थी भावनेने होतो. कवी स्वतःच्या वेदनेपेक्षा प्रेयसीच्या आनंदाला अधिक
महत्त्व देतो. त्यामुळे ही कविता केवळ प्रणयकाव्य न राहता निसर्ग, प्रेम आणि भावनांच्या सूक्ष्म छटांचे
सुंदर कलात्मक रूप ठरते.
"पाऊस..."
पाऊस म्हणजे छंद,
तिचा मला लागलेला,
पाऊस बेधुंद, रात्रभर जागलेला..
पाऊस हुडकत राहतो,
तिच्या घराची वाट,
मीही चालू लागतो मग, पावसाच्या पाठोपाठ..
पाऊस घाली धिंगाणा,
बघ तिच्याच अंगणात,
एक अनामिक भीती दाटते, मनातल्या मनात..
पाऊस मारी हाक तिला,
उभा राहून दारात,
तशी वाढली धडधड, माझ्याही उरात..
ऐकून हाक पावसाची ती,
आली गच्चीवरती,
पावसाला लाडे लाडे, धरले धारेवरती..
पाऊस म्हणाला,
"काही नाही, आठवण तुझी आली,
तुझ्याचसाठी धावत आलो,आभाळातून खाली
एक ओंजळ, दोन ओंजळ,
ती पाऊस घेत राहिली,
पावसासाठी पावसात तिला,भिजताना पाहिली
पावसात भिजून पावसाला,
मारली तीने मिठी,
मिठीत पाऊस,डोळ्यात माझ्या,पावसाची दाटी
तिच्याचसाठी पावसासारखा,
उभा अंगणात राहिलो,
एक पाऊस,दोन पाऊस,पाऊस झेलत राहिलो
मिठीत पाऊस,
डोळ्यांत तिच्या,
पाऊस बघत राहिलो,
तिच्यासाठी आभाळाकडे,पाऊस मागत राहिलो
तिच्यासाठी आभाळाकडे,पाऊस मागत राहिलो
- संजयगगेखरीडकर 7083937968
%20(2).png)
.webp)





%20(1)%20(quillbot.com).webp)






.jpg)